प्रत्येक व्यक्तीला एखादी गोष्ट करण्याची आवड असते, छंद असतो. ती व्यक्ती ती आवडीची गोष्ट आनंदाने करत असते. त्यामध्ये पुस्तक वाचन घ्या, लिखाण, क्रीडांगणावरील खेळ, पोहणे, पत्ते, व्हिडीओ गेम्ज खेळणे, या सर्व गोष्टी करण्यात वेगळा आनंद मिळत असतो. अशीच माझाही आवडीची एक गोष्ट आहे. ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण आहे. ती म्हणजे 'भटकंती'.......
माझी आवड वेगळ्या स्वरूपाची आहे. शाळेत असताना देखील मी वर्गामध्ये कमी, बाहेर जास्त असायचो. भटकायची सवय मला लहानपणापासून आहे. रविवार असो किंवा सुट्टीचा दिवस..... संपूर्ण वेळ नदीवर पोहण्यात, झाडावर चढण्यात, पेरू खाण्यात आणि गावभर फिरण्यात जायचा. त्यामुळे लहानपणचे ते दिवस आठवले तर, "लहानपण देगा देवा" हि अभंगाची ओळ आठवते. लहानपणीचे दिवस छान होते. अभ्यास न करता भरपूर मार्क्स मिळायचे. कारण सर सर्व ओळखीचे होते. शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये मात्र सहभाग असायचा. त्यामध्ये भाषण म्हणू नका, कबड्डी, खो-खो, रुंनिंग सगळ्या गोष्टी गाजवल्या आणि गाजल्यासुद्धा... त्यामुळे सर्व शिक्षक बऱ्यापैकी ओळखायचे. सांगायचं तात्पर्य एवढंच 'अभ्यास न करता मार्क्स मिळायचे'. हे सर्व ओळखून वडील "वासरात लंगडी गाय शहाणी" म्हणायचे.... वाईट वाटायचं पण करणार काय? मनाला सवय लागली होती 'भटकंती'ची......

No comments:
Post a Comment